सोने तेजीत; ‘या’ गोल्ड फंडाचा दमदार परतावा

Spread the love

महाराष्ट्र २४- मुंबई : गेल्या महिनाभरात कमॉडिटी बाजारात सोने-चांदीला नवी झळाळी मिळाली आहे. चीनमध्ये ‘करोना’ विषाणूने थैमान घातल्यापासून जगभरातील वित्तीय बाजारपेठांमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण झाले असून गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे सोन्यातील तेजी दिवसागणिक वाढत आहे. यामुळे गोल्ड फंड्स सुद्धा गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. त्यातील एका गोल्ड फंड योजनेने मागील वर्षभरात ३० टक्के परतावा देऊन गुंतवणूकदारांना खूश केले आहे.

‘करोना’ने भांडवली बाजारात अनिश्चित वातावरण आहे. मागील आठवडाभरात शेअर निर्देशांकांची धुळदाण उडाली आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदारांनी शेअरमधील पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. वित्तीय बाजारपेठांमध्ये अस्थिरता असल्यास गुंतवणूकदार तो पैसा सोन्यासारख्या सार्वकालीन सुरक्षित गुंतवणूक पर्यायात गुंतवतात. त्यामुळेच शेअर बाजारात पोळलेल्या गुंतवणूकदारांकडून गोल्ड फंड, ‘गोल्ड इटीएफ’सारख्या योजनांचा आढावा घेतला जात आहे.
गोल्ड फंड, सोन्यात गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड, गोल्ड इटीएफ या योजनांनी मागील वर्षभरात सरासरी २७ टक्के परतावा दिला आहे. तीन वर्षाच्या काळात ११.९३ टक्के आणि पाच वर्षाच्या काळात ८.५६ टक्के परतावा दिला आहे. मात्र याच श्रेणीतील एका गोल्ड फंडाने वर्षभरात ३० टक्के परतावा देऊन सरस कामगिरी केली आहे. ‘इन्व्हेस्को इंडिया गोल्ड फंड’ ही योजना मागील वर्षभर सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *