महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑक्टोबर । 7 ऑक्टोबर पासून भाविकांना तुळजाभवानी मातेचे दर्शन घेता येणार आहे. दररोज पहाटे 4 ते रात्री 10 यादरम्यान सुमारे 15 हजार भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र कौजागिरी पौर्णिमेला होणारी गर्दी टाळण्यासाठी ही यात्रा रद्द करण्यात आली असून 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश बंदी असणार आहे. या काळात होणाऱया धार्मिक विधीसाठी केवळ मंहत, सेवेकरी, मानकरी व पुजाऱयांच्या उपस्थितीत होणार आहेत.
तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला असून 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेपासून तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ होत आहे. या पार्श्वभुमी जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावंकर, नुतन पोलिस अधिक्षक नीवा जैन हे या यात्रेचे नियोजन करत आहेत.
7 ऑक्टोबर पासून पहाटे 4 रात्री 10 या दरम्यान 15 हजार भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. भाविकांना केवळ देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यांना देवीस अभिषेक किंवा इतर विधी करण्याची परवानगी असणार नाही. कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करुन हे प्रवेश देण्यात येणार आहेत. म्हणजे प्रत्येक भाविकांचे शारीराचे तापमान बघून लक्षणे नसणाऱया भाविकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. राज्याबाहेरील भाविकांना जिह्यात प्रवेश करताना कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले असने गरजेचे आहे किंवा ज्या नागरीकांचे लसीकरण झालेले नाही अशा भाविकांसाठी 72 तासापुर्वीची आरटीपीसीआर चाचणी किंवा मग 14 दिवसाचे विलीगीकरण राहणार आहे.