भारतात तयार होत आहे फ्लाईंग कार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑक्टोबर । अनेक तासांचा प्रवास काही मिनिटात पूर्ण करणारी स्वप्नवत फ्लाईंग कार आता भारतातही आली आहे. व्हिनाटा एअरोमोबिलिटी या स्टार्टअप् कंपनीने ही हायब्रीड उडणारी कार तयार केली आहे. आणखी काही वर्षात ही कार शहरी प्रवासी वाहतुकीचा चेहरामोहराच बदलून टाकेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

व्हिनाटा एअरोमोबिलिटी ही स्टार्टअप् कंपनी भारतातल्या काही कल्पक तरुणांनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या फ्लाईंग कारचा प्रोटोटाईप नुकताच नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यासमोर प्रदर्शित करण्यात आला. ही भारतातील पहिलीच फ्लाईंग कार असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. प्रारंभी या कारचा उपयोग ऍम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) प्रमाणे रुग्णांची ने-आण करण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यानंतर काही वर्षांनी सर्वसामान्य प्रवासासाठीही ही कार उपलब्ध होऊ शकेल. टेकऑफ आणि लँडिंगसाठी ही कार विजेचा उपयोग करते. तर आकाशातील प्रवासासाठी जैवइंधनाचा उपयोग करते. त्यामुळे तिचा समावेश हायब्रीड या श्रेणीत करण्यात आला आहे. प्रोटोटाईपपासून प्रत्यक्ष उत्पादन करण्यासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणे शक्मय आहे. 2023 पर्यंत भारतात सर्वत्र ही कार दिसू लागेल, असा कंपनीला विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *