MI vs DC: मुंबई इंडियन्सचा आज पराभव झाल्यास प्ले ऑफचे गणित बिघडणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑक्टोबर । आयपीएलच्या १४व्या हंगामात आज शनिवारी डबल हेडरमधील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. गतविजेता मुंबईचा संघ खराब फॉर्ममध्ये आहे तर गत उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सने १६ गुणांसह प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर पुढील तिनही लढतीत विजय मिळवावा लागले. जर त्यापैकी एका जर लढतीत पराभव झाला तर त्याचे प्ले ऑफचे गणित बिघडले.

मुंबई इंडियन्सने ११ पैकी ५ लढती जिंकल्या आहेत. त्याचे १० गुण असून ते गुणतक्त्यात सहाव्या स्थानावर आहेत. आज दिल्लीविरुद्ध त्यांचा पराभव झाल्यास त्यांना प्ले ऑफसाठी अन्य संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागले. मुंबईची आणखी एक डोकेदुखी म्हणजे त्याचे नेट रनरेट होय. गुणतक्त्यात १० गुण असलेले तीन संघ आहेत. त्यापैकी मुंबईचे नेट रनरेट सर्वात कमी म्हणजे वजा ०.४५३ इतके आहे. प्ले ऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना नेट रनरेटचा देखील विचार करावा लागले.

दिल्ली कॅपिट्लसचा यापुढील सामन्यात पराभव झाला तरी ते प्ले ऑफमध्ये पहिल्या चार मध्ये स्थान नक्की करू शकतील. आणखी एक विजय त्यांना गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळवून देऊ शकतो. साखळी फेरीनंतर गुणतक्त्यातील पहिल्या दोन संघांना अंतिम फेरीत जाण्याची दोन वेळा संधी मिळते.

मुंबईला अखेरच्या दोन लढती सातव्या आणि आठव्या क्रमांकावर असलेल्या राजस्थान रायल्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायच्या आहेत. यातील राजस्थानचे प्लेऑफमधील आशा संपुष्ठात आलेल्या नाहीत. कोलकाता तिसऱ्या आणि चौथ्या स्थानाच्या शर्यतीत आहे. अशात आज मुंबईचा पराभव झाल्यास राजस्थान आणि कोलकाता संघाला फायदा मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *