महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ ऑक्टोबर ।अजितदादांचे शहरातील नागरिक केंद्रीत प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतेच शिवाय पवार साहेबांनी सुध्दा पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शहरात यावे, ही मागणी करण्याकरिता आमदार अण्णा बनसोडे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते तसेच माजी नगरसेवकांच्या शिष्ठमंडळाने काही दिवसापुर्वी पवार साहेबांची भेट घेतली. सत्ताधा-यांनी केलेल्या भ्रष्टाचारासह विकासकामांच्या सर्वच मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पदाधिकाऱ्यांच्या मागणीचा विचार करून 13 ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरात येऊन माजी नगरसेवकांची बैठक घेण्यास पवारसाहेबांनी अनुमती दर्शविली आहे. तसेच, आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी पक्षाचा मेळावा घेण्यासही त्यांनी संम्मती दाखविली आहे.
१३ ऑक्टोबर रोजी मा शरद पवार साहेब यांच्या उपस्थित होणाऱ्या माजी नगरसेवकांच्या बैठकी बाबत आढावा बैठक आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात संपन्न झाली त्यामध्ये खालील मुद्यावर चर्चा झाली:यात बैठकीचे ठिकाण निवडण्याबाबत तसेच बैठकीला सर्व माजी नगरसेवक यांना निमंत्रण देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. सदर बैठकीला इतर मान्यवरांना देण्याबाबत निमंत्रण देण्याबाबत चर्चा झाली .
कार्यक्रमात सर्वात प्रथम कार्यकारणी जाहीर करावी व त्यांचा यथोचीत सत्कार करावा. महिलांचा देखील समावेश असावा. प्रतिष्टीत व जेष्ठ असणारे पक्षाला मानणारे लोकांनी पक्षाला व माजी नगरसेवकांना ताकद द्यावी. येत्या निवडणुकीत कोण कोणत्या मुद्द्यावर जास्त भर द्यावा लागणार , व सत्ताधार्यांना कसे घेरायचे या विषयावर चर्चा करण्यात आली .
बैठीकाला आ.अण्णा बनसोडे, मा.आ.विलास शेठ लांडे , जेष्ठ नेते आझमभाई पानसरे , माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष जगदीश भाई शेट्टी, काळूराम पवार , विजय बबन कापसे ,मनोज खानोलकर ,प्रसाद शेट्टी ,हरेश अश्विनी ,तानाजी खाडे ,जगनाथ साबळे ज्ञानेश्वर माऊली सुर्यवंशी, सनी ओव्हाळ, शामराव वालेकर ,राजेंद्र जगताप ,पंडित रामभाऊ गवळी ,कैलाश थोपटे ,अंकुश पठारे ,किरण मोटे ,श्रीदंग काशीब शिंदे ,धलिया राम आधार ,रामा ओव्हाळ . हे मान्यवर उपस्थित होते .