महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑक्टोबर ।साडे तीन शक्ती पीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेलं नाशकातील सप्तशृंगी देवी मंदिर आज पासून भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. आज दिवसभर मंदिर राहणार खुलं राहणार आहे. एका दिवसात 24 हजार भाविकांना दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. भाविकांना दर्शनासाठी पासची सुविधा करण्यात आली आहे. कोरोना नियमांचं पालन करत दर्शन घेण्याच्या भाविकांना सूचना देण्यात आल्या आहेत.