महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑक्टोबर । आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोने (gold rates) खरेदी करणे स्वस्त झालेय. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रीला सुरुवात झाली आहे. नवरात्रीमध्ये मागणी वाढणे अपेक्षित आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतींना खालच्या पातळीवर आधार मिळू शकतो. मात्र, सोन्यात मोठी तेजी येण्याची आशा नाही. कारण आंतरराष्ट्रीय किमती सतत घसरत आहेत.दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव स्थिर आहेत. त्याचबरोबर चांदीच्या भावात 300 रुपयांनी वाढ झाली.
दिल्लीच्या सराफा बाजारात 22 कॅरेटसाठी आज सोन्याचा भाव 45,750 आहे. तर 24 कॅरेटसाठी आज सोन्याचा भाव 49,910 आहे. कालचे भाव बघता सोन्याचे दर स्थिर पाहायला मिळाले.
चांदीच्या किंमतीत देखील आज किंचीत वाढ पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आज चांदीच्या दरात 300 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. यानंतर चांदीचे दर 61,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही.