आता आईस्क्रिमची गोडी महागणार ; 18 टक्के जीएसटी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑक्टोबर । तुम्हाला आईस्क्रीम आवडत असेल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता आईस्क्रीम महाग होणार आहे. आईस्क्रीम पार्लरमधल्या आईस्क्रीमवर 18 % जीएसटी लागणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अर्थात सीबीआईसीनं हे स्पष्ट केलं आहे.

१७ सप्टेंबरला झालेल्य़ा जीएसटीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. आईस्क्रीम पार्लरमधलं आईस्क्रीम हे सेवा विभागात येत नाही तर उत्पादन विभागात येतं. कारण पार्लरमध्ये तयार असलेलं आईस्क्रीम फक्त विकलं जातं, त्यामुळे आईस्क्रीमवर आता १८ टक्के जीएसटी लागणार आहे. सहाजिकच आईस्क्रीमच्या किमतीत वाढ होणार आहे. १ एप्रिलपासून जीएसटीचा नवा नियम लागू होणार आहे.

सीबीआयसीने सर्कुलरमध्ये काही सेट जाहीर केले आहे. 21 वस्तू आणि सेवांशी संबंधित दरांवर बदल होणार आहे. ज्याचा निर्णय 17 सप्टेंबर रोजी 45 व्या जीएसटी कॉन्सिलमध्ये बैठक घेतली जाणार आहे.

सीबीआयसीने स्पष्ट केले की, आइस्क्रीम पार्लरमध्ये आधीच तयार केलेले आइस्क्रीम विकतात आणि रेस्टॉरंट सारख्या वापरासाठी आइस्क्रीम शिजवू/तयार करत नाहीत. पुरवठ्यातील काही घटक दिले जात असले तरी सेवा म्हणून नव्हे तर वस्तू म्हणून आइस्क्रीमचा पुरवठा केला जातो. हे स्पष्ट केले आहे की, पार्लर किंवा तत्सम कोणत्याही दुकानातून विकले जाणारे आइस्क्रीम 18 टक्के दराने जीएसटी आकारेल. रेस्टॉरंटमध्ये विकल्या जाणाऱ्या अन्नावर इनपुट टॅक्स क्रेडिटशिवाय 5% कर आकारला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *