बेस्ट मायलेज देणाऱ्या कार ; ५ लाखांपेक्षा कमी किंमतीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑक्टोबर । सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्याने बाजारात चांगले मायलेज देणाऱ्या कारची मागणी सतत वाढत आहे. तुम्ही देखील तुमच्या बजेटमध्ये चांगले मायलेज देणाऱ्या कारचे बाजारात 5 लाख रुपयांखाली अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत, आज आपण अशाच काही कार ऑप्शन्स बद्दल जाणून घेणार आहोत.

मारुती सुझुकी अल्टो
मारुती सुझुकी अल्टोची किंमत 3,15,000 पासून सुरू होते. या कारमध्ये तुम्हाला 0.8-लिटर पेट्रोल इंजिन मिळेल जे 48PS पॉवर आणि 69Nm टॉर्क जनरेट करते, या इंजिनसह 5-स्पीड MT जोडलेले आहे. अल्टो पेट्रोल MT च्या मायलेज बद्दल बोलायचे झाल्यास, या कारला तुम्हाला 22.05kmpl चे मायलेज मिळेल. तुमच्यासाठी ही कार बेस्ट ऑप्शन ठरु शकते.

मारुती सुझुकी एस-प्रेसो
मारुती सुझुकी एस-प्रेसो या कारची किंमत 3,78,000 रुपयांपासून सुरु होते. या कारमध्ये तुम्हाला K10B, 1.0-लिटर पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे ज्यात 5-स्पीड MT आणि 5-स्पीड AMT पर्याय देखील मिळतात. S-Presso पेट्रोल MT/AMT कारचे मायलेज 21.7kmpl आहे. कमी किंमतीत बेस्ट मायलेज देणारी ही कार देखील तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरु शकते.

मारुती सुझुकी सेलेरियो
मारुती सुझुकी सेलेरियो या कारची किंमत, 4,65,700 पासून सुरू होते. यात S-Presso सारखेच K10B, 1.0-लिटर पेट्रोल इंजिन मिळते जे 5-स्पीड MT किंवा 5-स्पीड AMT मध्ये जोडले जाऊ शकते. तसेच सेलेरियो पेट्रोल MT/AMT चे मायलेज 21.63kmpl आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर
मारुती सुझुकी वॅगनआरची किंमत 4,93,000 रुपयांपासून सुरू होते. WagonR कारमध्ये देखील K10B, 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 5-स्पीड MT आणि 5-स्पीड AMT पर्यायांसह येते. WagonR 1.0 पेट्रोल MT/AMT कारचे मायलेज 21.79kmpl आहे. या हॅचबॅक कारमध्ये K12M, 1.2-लिटर पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील आहे. पण त्याची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *