विद्यार्थ्यांना लोकलचे तिकीट- पास मिळणार ?; मध्य रेल्वेचे सरकारला पत्र

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑक्टोबर । महामुंबईत शाळा सुरू झाल्या खऱ्या, मात्र विद्यार्थ्यांच्या लोकल प्रवासाबाबत राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. सध्या शाळकरी विद्यार्थ्यांना लोकलचा तिकीट तसेच पास मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना तिकीट तसेच पास देण्याची मुभा देण्यात यावी, असे पत्र मध्य रेल्वेनेच राज्य सरकारला धाडले आहे.

‘मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) शाळा ४ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. अनेक विद्यार्थी रेल्वे स्थानकांतील तिकीट खिडक्यांवर तिकीट आणि पासबाबत विचारणा करत, तिकीट-पास देण्याची मागणी करत आहेत. सद्यस्थितीत एमएमआरमधील विद्यार्थ्यांना लोकल प्रवासासाठी तिकीट किंवा पास देण्याच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाही. हे लक्षात घेता, विद्यार्थ्यांना लोकल प्रवास करता यावा, यासाठी तिकीट अथवा पास देण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात यावी, अशी विनंती आहे,’ असे मध्य रेल्वेने राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कार्यालयाने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला हे पत्र पाठवले आहे. यामुळे आता मध्य रेल्वेच्या पत्राची दखल घेऊन राज्य सरकार याबाबत सूचना जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा कधी देणार, याकडे संपूर्ण पालकवर्गाचे लक्ष आहे.

लोकलच्या तिकीट तसेच पासअभावी विद्यार्थ्यांना सध्या तरी खड्डेमय रस्त्यांतूनच शाळा गाठावी लागत आहे. त्यामुळे या बाबत सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *