‘या’ जिल्ह्यात जोरदार गारपीट, द्राक्ष – मका पिकांचे मोठे नुकसान

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑक्टोबर । Heavy crop damage in Nashik : जिल्ह्यातील निफाड (Nifad) तालुक्याच्या उत्तर पट्यात काल सायंकाळच्या सुमारास कुंभारी परिसरात जोरदार गारपीट सहवादळी पाऊस झाला. (Hailstorm and unseasonal rain) यामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या गारपिटीने काही भागातील द्राक्ष पिकावरील नवीन फुटव्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे. (Rain, hailstorm cause heavy crop damage in Nashik)

द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यासमोर द्राक्षाचे पिक जमिनीवर सपाट झाले. डोळ्यासमोर पिक भुईसपाट झाल्याने उराशि बाळगलेले स्वप्न मातीमोल झाले. वर्षभर पोटच्या लेकराप्रमाणे झाडांची जोपासना केली, लाखो रूपयाचा खर्च करून तयार केलेल्या झाडांकडुन दोन पैसे मिळतील, हे स्वप्न आसमानी संकटाने पुन्हा एकदा हिरावुन घेतले आहे, अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, परिपक्व झालेल्या मका काही ठिकाणी वादळाने भुईसपाट झाला तर सोयाबिन पिकात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे ही पिकेही हातची जाणार असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *