Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Petrol Diesel Price: मुंबईत डिझेलचे शतक , पेट्रोलच्या दरातही वाढ, जाणून घ्या आजचा भाव - Maharashtra 24

Petrol Diesel Price: मुंबईत डिझेलचे शतक , पेट्रोलच्या दरातही वाढ, जाणून घ्या आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर । भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून सलग पाचव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल 26 ते 30 पैसे आणि डिझेल 33 ते 37 पैशांनी महागले आहे. मुंबईत पहिल्यांदाच डिझेलने शंभरीचा टप्पा ओलांडला आहे. तर मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोल शंभरीपार गेले आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 109.83 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 100.29 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 103.84 आणि 92.35 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्थिक धोरण आढाव्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलवरील कर व्यतिरिक्त इतर अनेक मुद्दे आहेत ज्यावर सरकारला निर्णय घ्यावा लागेल. सरकार आणि रिझर्व्ह बँक या विषयांवर सतत बोलत असतात. आम्ही वेळोवेळी आमची चिंता सरकारपर्यंत पोहचवतो. ते म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलचा प्रश्न आहे, आम्ही या विषयावर चिंता व्यक्त केली आहे. आता यावर सरकारने निर्णय घ्यायचा आहे. मी यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही.

कच्च्या तेलाचे तर सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *