आरटीई प्रवेशासाठी पूर्व प्राथमिकच्या जागांची वानवा

Spread the love

महाराष्ट्र २४; पुणे : पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी सर्वाधिक ९७२ खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये यंदा आरटीई प्रवेशाच्या १७,०५३ जागा उपलब्ध आहेत. त्यातील सुमारे ९३ टक्के शाळांनी नर्सरी व केजीस्तरावरचे प्रवेश नाकारले आहेत. आरईटी प्रवेशाच्या एकूण १७,०५३ पैकी १५,६३८ जागांवर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. परिणामी ३ ते ५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी शाळांमध्ये खूप कमी जागा उपलब्ध आहेत. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी अनेक शाळांनी इयत्ता पहिली हाच ‘एन्ट्री पॉईंट’ ठेवला आहे. परिणामी पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची मोठी निराशा झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळांचे ” एन्ट्री पॉईंट ” तपासून घ्यावेत, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

आरईटी प्रवेशाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पालकांनी घराजवळील नर्सरी, केजी एन्ट्री पॉईंटच्या शाळांचा शोध घेतला. परंतु, अनेक पालकांना या शाळाच सापडल्या नाहीत. परिणामी ६ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच आरटीईच्या शाळांमध्ये प्रवेश अर्ज भरता येत आहे. त्यामुळे वर्षभर आरटीईअंतर्गत प्रवेश मिळण्याच्या आशेने दुसऱ्या कोणत्याही शाळेत पाल्याचा प्रवेश न केलेल्या पालकांची मोठी पंचाईत झाली आहे. तसेच शाळांनी अचानक बदललेल्या ‘एन्ट्री पॉईंट’ची पालकांना कल्पना नसल्याने त्यांची अडचण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *