घरगुती गॅस सिलंडर आता ५२ रूपयांनी स्वस्त

Spread the love

महाराष्ट्र २४; मुंबई ; होळीपूर्वी लोकांना  सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कारण एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली असुन विना अनुदानित १४.२ किलो एलपीजी सिलिंडर १ मार्चपासून म्हणजेच आजपासून ५२ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

आतापर्यंत ८९३.५० रुपयांत मिळणारा घरगुती गॅस सिलिंडर मार्च महिन्यात ८४१ रुपयांना मिळणार आहे. फेब्रुवारीच्या मध्यात या सिलिंडरच्या दरात १४४.५० रुपयांची वाढ झाली होती. नवीन दर आजपासून रविवार (दि.१ मार्च) लागू झाले आहेत.

तसेच, व्यावसायिक सिलिंडरचे (१९ किलोग्रॅम) दरही ८४.५० रुपयांनी कमी केले आहेत. व्यावसायिकांना आता सिलिंडर १४६५.५० रुपयांत मिळेल. पाच किलोग्रॅमचा छोटू सिलिंडरही १८.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. छोटू सिलिंडर आता ३०८ रुपयांना मिळेल.३२५.७१ रुपयांची सबसिडी

घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या बाजारभावात (बिगर सबसिडी) घट झाली असून ग्राहकाच्या खात्यात ३२५.७१ रुपयांची सबसिडी जमा होईल. म्हणजेच सबसिडी असलेला सिलिंडर ग्राहकाला सुमारे ५१५ रुपयांना मिळेल.

सरासरी आंतरराष्ट्रीय बेंचमार्क दर आणि विनिमय दरानुसार, एलपीजी सिलिंडरच्या किंमती निश्चित केल्या जातात. याच कारणास्तव, दरमहा एलपीजी सिलिंडरची अनुदानाची रक्कमही बदलते. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढतात तेव्हा सरकार अधिक अनुदान देते आणि दर खाली आल्यावर अनुदान कमी केले जाते. कराच्या नियमांनुसार, एलपीजीवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) इंधनाच्या बाजारभावानुसार मोजला जातो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *