बँकांचे नियम बदलले; सर्वसामान्यांच्या खिशावरअसा होणार परिणाम

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 –
एक मार्चपासून अनेक नियमांमध्ये बदल झाला आहे. या नियमांमध्ये बदल झाल्याने त्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर पडण्याची शक्यता आहे. ‘फास्टॅग’पासून बँकिंग अॅप पर्यंतच्या सर्व नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जाणून घेऊया हे बदल…

१) एसबीआय ग्राहकांसाठी केवायसी : स्टेट बँकेच्या ज्या खातेधारकांनी अद्याप ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना एक मार्चपासून खात्यातील रक्कम काढता येणार नाही. स्टेट बँकेने ग्राहकांना २८ फेब्रुवारीपर्यंत ‘केवायसी’ पूर्ण करण्याविषयी बजावले होते. ‘केवायसी’ पूर्ण न करणाऱ्या ग्राहकांचे खातेही ब्लॉक करण्यात येणार आहे, त्यामुळे कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत.

२) मोफत ‘फास्टॅग’ बंद : मोफत ‘फास्टॅग’ची सुविधा २९ फेब्रुवारीला बंद करण्यात आली असून, १ मार्चनंतर संबंधितांना ते खरेदी करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारने महसुलात वाढ करण्यासाठी १५ फेब्रुवारीपासून २९ फेब्रुवारीपर्यंत ‘फास्टॅग’ मोफत देण्याची घोषणा केली होती. १ मार्चनंतर १०० रुपये दिल्यानंतरच ‘फास्टॅग’ उपलब्ध होणार आहे.

३) एटीएममध्ये २००० ची नोट नाही : सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेच्या एटीएममधून १ मार्चनंतर २००० रुपयांची नोट उपलब्ध होणार नाही. ज्या ग्राहकांना २००० रुपयांची नोट हवी आहे, त्यांना ती बँकेच्या शाखेमध्ये उपलब्ध होणार आहे. इंडियन\R बँकेच्या एटीएममध्ये २००० रुपयांऐवजी आता १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

४) एच़डीएफसीचे जुने अॅप बंद : एचडीएफसी बँकेचे जुने अॅप एक मार्चपासून बंद होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून बँकेचे नवे आणि जुने अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध होते. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये एचडीएफसी बँकेचे जुने अॅप असेल तर, ते काढून टाकून नवे डाउनलोड करणे आवश्यक आहे.

५) लॉटरीचे तिकीट महागले : एक मार्चपासून लॉटरीसाठी जीएसटीचा नवीन नियम लागू होणार आहे. नव्या नियमानुसार आता लॉटरीवर २८ टक्के जीएसटी लागू होणार आहे. डिसेंबर २०१९मध्ये जीएसटी परिषदेने सर्व राज्यांमध्ये सरकार मान्यताप्राप्त लॉटरीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या लॉटरीवर आता २८ टक्के जीएसटी लागू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *