15 मिनिटात चार्ज होणार इलेक्ट्रिक वाहन, Exponent Energy चा दावा…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑक्टोबर । देशातील इलेक्ट्रिक स्कूटर सेल कंपनी एथर एनर्जीचे माजी मुख्य उत्पादन अधिकारी अरुण विनायक यांनी स्वतःचा नवीन स्टार्टअप सुरू केला आहे. Exponent Energy असं या स्टार्टअप कंपनीचे नाव आहे. फ्लेक्सिबल एनर्जीचा स्टॅक बनवून इलेक्ट्रिक वाहनांसाठी वीज निर्मिती सुलभ करणे, हा या कंपनीचा उद्देश आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, हे एक तंत्रज्ञान आहे जे ग्रिड आणि वाहनामध्ये ऊर्जा आणि माहितीचा प्रवाह सक्षम करते, असे कंपनीचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी ई-पॅक आणि ई-पंप नावाची बॅटरी पॅक आणि चार्जिंग स्टेशन बनवणार आहे. कंपनीच्या या उत्पादनाद्वारे वाहन चारचाकी असो की दुचाकी ते फक्त 15 मिनिटात 0 ते 100 टक्के चार्ज होईल, असा दावा कंपनीने केला आहे.

Exponent Energy सह-संस्थापक अरुण विनायक यांनी यावर बोलताना सांगितलं आहे की, ”इलेक्ट्रिक वाहन 0 ते 1 पर्यंत हलवणे सोपे आहे. 1 ते 100 स्केल गाठणे आज ईव्हीसाठी किती जटिल आहे. आज चार्जर आणि बॅटरीमध्ये भयंकर अंतर आहे. तसेच चार्ज वेळ आणि बॅटरीचे आयुष्य ही एक मोठी समस्या आहे.” ते पुढे म्हणाले, ”हिंदुस्थानात इलेक्ट्रिक वाहनाचे बाजारात आणखीन वाढणार आहे, मात्र त्यासाठी गंभीर तांत्रिक समस्या सोडवून EV साठी ऊर्जा सुलभ करणे आवश्यक आहे.”

दरम्यान, Exponent Energy कंपनीचा15 मिनिटात इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्याचा हा दावा खरा ठल्यास हिंदुस्थानी इलेक्ट्रिक वाहन बाजारात मोठी क्रांती घडू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *