अलिशान जीवनशैलीचा त्याग करून निर्जन बेटावर राहणारा अब्जाधीश, २० वर्षांच्या अज्ञातवासानंतर पुन्हा एकदा चर्चेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – कॅनबेरा –
ऑस्ट्रेलियामधील एकेकाळचे अब्जाधीश खाणउद्योजक म्हणून देशभरात ज्यांची ख्याती होती असे डेव्हिड ग्लासीन एका निर्जन बेटावर गेल्या २० वर्षांपासून राहत आहेत. त्यांनी आपली कोट्यवधीची संपत्ती १९८७ साली आलेल्या आर्थिक मंदीमुळे गमावली. डेव्हिड ग्लासीन त्यादिवसापासून अलिशान जीवनशैलीचा त्याग करून एका निर्जन बेटावर राहत आहेत. ते जवळपास २० वर्षांच्या अज्ञातवासानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

डेव्हिड ग्लासीन यांनी एकटेपणा, नैराश्य, अपयशसारख्या संकटांशी लढा दिल्यानंतर ते आता आपल्यासोबत निर्जन बेटावर राहण्यासाठी एका सोबतीची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी स्वत:साठी ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर छोटीसे झोपडे बांधले आहे. काही जीवनावश्यक वस्तू या झोपडीत असून सध्या त्यांच्या सोबत त्यांचा लाडका श्वानही आहे.

‘डेली टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत ते उपरोधिकपणे म्हणाले की, आता या निर्जन बेटावर एकट वाटत आहे, माझ्याशी येथे बोलायलाही कोणी नाही. आता मी येथे फक्त एखादी जलपरी येईल आणि माझा एकटेपणा घालवेल एवढ्याच आशेवर दिवस घालवत आहे. त्यांनी आपल्या छोट्याश्या झोपडीत सौरउर्जेचा वापर करून विजेची व्यवस्था केली आहे. डेव्हिड यांना ओळखणारे अनेकजण त्यांना भेटायला येथे आवर्जून येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *