फास्ट चार्जिंगची ट्रीटॉन इलेक्ट्रिक कार दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ ऑक्टोबर । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींना पर्याय शोधण्याचा प्रयत्न विविध कंपन्या करत असल्याचे पहावयास मिळत आहे. वाहन क्षेत्रात इलेक्ट्रिक कार हा पर्याय समोर येत आहे.

हीच संधी साधत आता अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी ट्रीटॉनने भारतात आपले मॉडेल एच इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर केले आहे. यामध्ये इलेक्ट्रिक कारची विशेष गोष्ट म्हणजे एका चार्जिंगवर जवळपास 1200 किमी गाडी धावणार असल्याचा दावा कंपनीने यावेळी केला आहे.

पूर्ण चार्जिंगचा दावा

यामध्ये एसयूव्हीमध्ये 200केडब्लूएच बॅटरी पॅकसोबत एक सेट पॉवर मिळणार आहे. यामध्ये हायपरचार्जचा पर्याय मिळणार आहे. ट्रीटॉन ईव्हीने दावा केला आहे, की इलेक्ट्रिक एसयूव्ही फक्त दोन तासात पूर्ण चार्जिंग होते.

अन्य नोंदी

कारची लांबी 18 फूटपेक्षा अधिक, आठ लोकांसाठी बसण्याची सोय
तेलंगणात सुरु होणार कंपनीचा प्रकल्प
भारतासोबत बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्येही उत्पादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *