आता लांब रांगेत उभे न राहता बनवा पॅन कार्ड; असा करा अर्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २०ऑक्टोबर । कायमस्वरूपी खाते क्रमांक अर्थात पॅन कार्ड क्रमांक हा आयकर विभागाने प्रसिद्ध केलेला एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. याचा व्यापक वापर लक्षात घेत विभागाने पॅनसाठी होणाऱ्या अडचणी सोडविण्याकडे लक्ष पुरवले आहे. आता लांब रांगेत उभे न राहता १० मिनिटांच्या आत तुम्ही पॅन कार्ड मिळवू शकता.

प्राप्तिकर विभागाने ई-फाइलिंग पोर्टलवर एक नवीन सुविधा सुरू केली आहे, जी एखाद्या व्यक्तीच्या आधार क्रमांकाच्या आधारावर ग्राहकांना पॅन वाटप करते. अटींची पूर्तता केल्यानंतरच या सुविधेचा वापर करू शकता.

सदर व्यक्तीला कधीही पॅन मिळालेले असू नये. तसेच मोबाईल क्रमांक त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेला असावा. त्यांची संपूर्ण जन्मतारीख आधार कार्डवर उपलब्ध असावी आणि पॅनसाठी अर्ज करण्याच्या तारखेला सदर व्यक्ती अल्पवयीन नसावा.

झटपट पॅन कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम www.incometax.gov.in च्या संकेतस्थळावर जा. येथे होम पेजवर दिलेल्या ‘इन्स्टंट ई-पॅन’ पर्यायावर क्लिक करा. ‘गेट न्यू ई-पॅन’ वर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक टाका. आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा. आधार तपशील भरा. तुमचा ई-मेल आयडी वैध करा आणि तुमचे ई-पॅन डाउनलोड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *