पाकिस्तानला धूर चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज, ‘या’ 11 खेळांडूसोबत पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरणार विराट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑक्टोबर । टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून, भारताचा पहिला सामना पाकिस्तान सोबत होणार आहे. नेहमीच नागरिकांना भारत-पाकिस्तान सामना बघण्याची उत्सुकता पाहायला मिळते. दोन वर्षानंतर आता पुन्हा येत्या 24 ऑक्टोंबरला दुबईतील मैदानावर दोन्ही टीम आमने-सामने असणार आहे. त्यामुळे या हायव्होल्टेज सामन्यासाठी टीम इंडियामध्ये प्लेइंग इलेवन कोण असणार याची सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहे.

दोन्ही सराव सामन्यांमध्ये टीम इंडियाने चांगल्याप्रकारे भुमिका निभावली आहे. इंग्लंडला 7 विकेटने तर ऑस्ट्रेलियाला 8 विकेटने भारताने मात दिली आहे. त्यामुळे टीम इंडिया कशाप्रकारे टी-20 सामन्यासाठी सज्ज आहे. हे यावरून स्पष्ट होते. दोन्ही सामन्यांच्या आधारावर पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाची प्लेइंग इलेवन नेमके कशा प्रकारे असू शकते? जाणून घेऊया…

जगातला सर्वात घातक टॉप ऑर्डर
भारत-पाकिस्तान सामन्याची सुरुवाताची जवाबदारी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. हे खेळाडू सामन्यासाठी तयार झाले असून, सामन्याची वाट ते पाहत आहेत. या दोन्ही खेळांडूकडून भारताला खूप मोठी अपेक्षा आहे. कारण पाकिस्तानला सुरुवातीलाच हे दोघेही धूर चारू शकतात. कारण राहुलने सराव सामन्यामध्ये इंग्लंडला 51 आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 39 धावा केल्या होत्या.

तर हिटमॅनने देखील ऑस्ट्रेलिया टीम विरुद्ध 41 चेंडूत 60 धावा केल्या होत्या. त्यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकाला उतरणार आहे. पहिल्या सराव सामन्यात कोहलीने स्पष्ट केले होते की, टूर्नामेंटमध्ये तिसऱ्या स्थानी मैदानात उतरणार आहे. मात्र कोहली आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शेवटच्या पाच डावांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा काढू शकला नाही. त्याला इंग्लंडविरुद्ध 11 धावांवर बाद व्हावे लागले.

सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत

सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत हे सामन्यात चौथ्या क्रमांकावर उतरणार आहे. मागील काही सामन्याचा जर विचार केला तर सूर्याने कमालीची कामगिरी केली होती. IPL-14 च्या शेवटच्या सामन्यात त्यांनी हैद्राबाद विरुद्ध 40 चेंडूत 82 धावा काढल्या होत्या. तसेच दुसऱ्या सराव सामन्यामध्ये देखील 27 चेंडूत त्यांनी 38 धावा केली होत्या. ऋषभ पंतने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांना प्रभावीत केले आहे.

दमदार फिनिशर
हार्दिक पांड्याबाबत सांगायचे झाल्यास पाक विरुद्ध तो गोलंदाजी करणार की नाही यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र पांड्या पाकिस्तान विरुद्ध फिनिशरच्या भुमिकेत नक्कीच दिसणार आहे. कारणा पांड्या हा अंतिम ओव्हरमध्ये भारतीय संघासाठी अधिकच्या धावा काढू शकतो. दुसरा सराव सामन्यात देखील पांड्याने सामन्या संपवतांना 8 चेंडूत 14 धावा काढला होत्या.

दोन स्पिनर्सला मिळणार जागा
पाकिस्तान विरुद्ध सामन्यासाठी दोन स्पिन गोलंदाज (रविंद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती किंवा अश्विन) यांना मैदानात उतरवू शकते. जडेजा हा गोलंदाजासह टीमसाठी फलंदाजीसाठी देखील अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. IPL च्या फेज-2 मध्ये त्याने अंतिम ओव्हरमध्ये वेगवान धावा काढत चेन्नईसाठी चांगले प्रदर्शन केले होते. त्यामुळे भारतीय संघासाठी जडेजाची गोलंदाजी देखील खूप महत्वाची आहे.

दुसऱ्या स्पिनर्सचा जर आपण विचार केला तर, त्यामध्ये आर आश्विन आणि वरूण चक्रवर्ती यांच्या नावाची चर्चा होऊ शकते. त्यात चक्रवर्तीच्या नावावर शिक्क मोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. वरूण चक्रवर्तीने UAE च्या मैदानावर टी-20 मध्ये 28 गडी बाद केले होते. पाकिस्तानच्या संघाने आतापर्यंत वरूणविरुद्ध एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे वरूणची गोलंदाजी पाकिस्तानला महागात पडू शकते.

शमी आणि बुमराह

वेगवान गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांची प्लेइंग इलेवनमध्ये जागा निश्चित करण्यात आली आहे. शमी देखील सामन्यासाठी सज्ज झाला असून, त्याने IPL च्या दुसऱ्या टप्प्यात 11 गडी बाद केले होते. शमी व्यतिरिक्त बूम-बूम बुमराह असताना टीम इंडियात असल्याने पाकिस्तान समोर मोठे आव्हान आहे.

टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहने कमालीची गोलंदाजी करत सर्वात अधिक गडी बाद केले आहे. भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये जसप्रीत आणि शमी बरोबरच भुवनेश्वर कडून देखील संघाला मोठी अपेक्षा आहे. भुवीने त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी केली नसेल, पण या मोठ्या सामन्यातील त्याचा अनुभव भारतीय संघासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. भुवनेश्वर कुमारने भारतासाठी 51 टी-20 सामन्यात 50 गडी बाद केले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *