आजपासून पुन्हा सुरूवात, कशी करायची 156KM ड्रायव्हिंग रेंज देणाऱ्या ई-बाईक RV 400 साठी बुकिंग?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑक्टोबर । देशातली आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी Revolt Motors ने आज, २१ ऑक्टोबरपासून आपल्या प्रमुख इलेक्ट्रिक बाईक आरव्ही 400 साठी (Revolt RV 400 ) बुकिंग स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. ग्राहकांकडून शानदार प्रतिसाद मिळत असल्याने कंपनीने या वर्षी तिसऱ्यांदा आपल्या फ्लॅगशिप ई-बाईकसाठी बुकिंग पुन्हा सुरू केले आहे. यासोबतच कंपनीने आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक बाईकसाठी नवीन एक्सटीरियर कलर थीम देखील सादर केली. सुधारित FAME-II सब्सिडी नंतर, Revolt RV 400 ला १.०७ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. यात राज्यातील सब्सिडीचा समावेश नाही.

एकूण ७० शहरांमध्ये Revolt RV 400 या बाईकसाठी बुकिंग सुरू झाले आहे. कोलकाता, जयपूर, सुरत, चंदीगड, लखनऊ आणि एनसीआरसह ६४ नवीन शहरांमध्ये प्रवेश करून कंपनीने भारतातील उपस्थिती वाढवली आहे. आतापर्यंत मुंबई, पुणे, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद या ६ शहराममध्येच कंपनीच्या बाईकसाठी बुकिंग करता यायची. मात्र, आता टियर -२ आणि टियर -३ शहरांमध्ये राहणारे लोक देखील कंपनीच्या वेबसाईटद्वारे ही बाईक बूक करू शकता. खाली बघा कशी करायची बुकिंग आणि बॅटरी व रेंजबाबत डिटेल्स –

बुकिंग कशी कराल?
बाईकच्या बुकिंगसाठी सर्वप्रथम कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरील(https://www.revoltmotors.com/) बुकिंग पेजवर जा.
त्यानंतर, आपले नाव, फोन नंबर, ईमेल, राज्य आणि शहर प्रविष्ट करा.
त्यानंतर आपण खरेदी करू इच्छित असलेला रंग प्रकार निवडा आणि “निवडा” वर क्लिक करा.
नंतर, तुम्हाला तुमच्या शहरावर आधारित डिलिव्हरी स्लॉट दाखवला जाईल.
त्यानंतर पेमेंट बटणावर क्लिक करा. बाईकच्या बुकिंगसाठी तुम्हाला सुमारे १९,९९९ रुपये मोजावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *