महाराष्ट्र 24 – तेलंगणा
चीनसह संपूर्ण जगभरात हाहाकार उडवणाऱ्या ‘कोरोना’ व्हायरसची लागण झालेले तीन रुग्ण हिंदुस्थानात आढळले. एक रुग्ण दिल्लीचा असून दुसरा तेलंगणातील आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जयपूरमध्येही कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळून आला आहे. इटलीतून राजस्थानमध्ये आलेल्या एका नागरिकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. यानंतर त्याला त्करित सवाई मानसिंह हॉस्पिटलच्या कॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. पहिल्यांदा प्रवाशाची थर्मल स्क्रिनिंग चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. यानंतर पुन्हा चाचणी करण्यात आली तेव्हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री रघू शर्मा यांनी दिली. हिंदुस्थानी नागरिकांना चीन, इराण, कोरिया, सिंगापूर तसेच इटलीचा प्रवास टाळण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी इटलीहून आलेल्या एका तरुणाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तेलंगणातील तरुण हा दुबईहून परतला आहे. दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांना तज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याचे डॉ. हर्ष वर्धन म्हणाले. देशातील 21 विमानतळे, 12 मोठी बंदरे आणि 65 छोटय़ा बंदरांवर प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हिंदुस्थानात आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेले पाच रुग्ण समोर आले आहेत. चीन, दक्षिण कोरिया, जपान, इटली, इराण, हाँगकाँग, तैवान, सिंगापूर, मलेशिया, व्हीएतनाम, इंडोनेशिया व नेपाळ या देशांतून विमानतळावर येणाऱया प्रत्येक प्रवाशाची होणार कोरोना तपासणी. ती व्यक्ती हिंदुस्थानी असो वा परदेशी. तपासणी होणारच! असे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले.