किती दिवस जिवंत राहतो कोरोना व्हायरस?

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – नवी दिल्ली-
कोरोना व्हायरसमुळे पूर्ण जगात दहशत पसरलेली आहे. यावर अनेक प्रश्न उद्भवतं असले तरी मेडिकल आणि रिसर्च टीमला ठाम उत्तर मिळत नाहीये. परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. अशात एक प्रश्न हा देखील पडत आहे की अखेर किती दिवस जिवंत राहतो कोरोना व्हायरस? तसं तर, कोरोना व्हायरस जिवंत राहण्याबद्दल काही स्पष्ट माहिती मिळालेली नाही तरी काही मेडिकल टीम यावर रिसर्च करत आहे.

9 दिवस जिवंत राहू शकतं
मानवात आलेले MERS आणि SARS सारखे कोरोना व्हायरस निर्जीव पदार्थांमध्ये आढळले होते, जसे धातू, काच किंवा प्लास्टिक इतर सामील आहे. ‘द जरनल ऑफ हॉस्पिटल इन्फेक्शन’ मध्ये प्रकाशित एका रिसर्चप्रमाणे MERS आणि SARS व्हायरस या वस्तूंच्या पृष्ठभागावर नऊ दिवस जिवंत राहू शकतात. रिसर्चप्रमाणे घरात पडलेल्या दररोजचे आवश्यक सामान धुवत राहिल्याने व्हायरसच्या धोक्यापासून वाचता येऊ शकतं.
रिसर्चमध्ये हे देखील सांगण्यात आले आहे की जनावरांहून मानवात येणार्‍या कोरोना व्हायरसला कोणत्याही पृष्ठभागेवरुन एका मिनिटात हटवता येऊ शकतं. यासाठी 62% ते 71% एथनॉल, 0.5% हाइड्रोजन पेरॉक्साइड किंवा 0.1% सोडियम हाइपोक्लोराइट किंवा ब्लीच वापरलं पाहिजे.

येथे संशयाची परिस्थिती
रोग नियंत्रण आणि प्रतिबंधाचे अमेरिकी केंद्राप्रमाणे अनेकदा हे व्हायरस जनावरांहून माणसांपर्यंत पोहचतं. तरी याबद्दल अधिकृत माहिती दिली गेली नाही की चीनच्या वुहान येथे कोरोना पसरण्याची सुरुवात कोणत्या जनावरामुळे झाली होती. तरी सुरुवाताची अध्ययनाप्रमाणे लोक उंटांच्या संपर्कात आल्यानंतर कोरोना व्हायरस मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) ने संक्रमित झाले होते. वैज्ञानिकांप्रमाणे सिवियर ऐक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम (SARS) संक्रमण लहान मांजरींमुळे झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *