महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑक्टोबर । देशात पेट्रोल आणि डिझेल उच्चांकी पातळीवर आहेत. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलात होत असलेल्या भाव वाढीने कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला होता. सलग पाच दिवस दरवाढ केल्यानंतर आज सोमवारी कंपन्यांनी तूर्त विश्रांती घेतली. आज पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही.
आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११३.४६ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०७.५९ रुपये इतके आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०४.५२ रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०८.११ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११६.२६ रुपये असून बंगळुरात पेट्रोल १११.३४ रुपये आहे.
मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव १०४.३८ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९६.३२ रुपये इतका वाढला आहे. चेन्नईत १००.५९ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९९.४३ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०५.६४ रुपये असून बंगळुरात डिझेल १०२.२३ रुपये आहे.
ऑक्टोबरमध्ये पेट्रोल ६.४० रुपयांनी महागले आहे तर मागील २४ दिवसांत डिझेल ७.७० रुपयांनी महागले आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेल दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये तफावत झपाट्याने कमी होत आहे.
\