एसटी कर्मचाऱ्याने एसटीला लटकून घेतला गळफास; दिवाळीच्या तोंडावरच अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑक्टोबर । एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेलं आंदोलन मागे घेतल्यावर दुसऱ्या दिवशी अहमदनगरमध्ये एका एसटी कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. आज (२९ ऑक्टोबर) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे या एसटी कर्मचाऱ्याने एसटीच्या मागील बाजूस असलेल्या शीडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शेवगाव आगरात आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. दिलीप काकडे यांच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण, महागाई भत्ता वाढ आणि घरभाडे भत्ता वाढ या मागण्यांसाठी नुकतंच काम बंद आंदोलन सुरू झालं होतं. मात्र, राज्य शासनाने यातील काही मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. दिलीप हरिभाऊ काकडे हे महाराष्ट एसटी कामगार संघटनेचे सदस्य होते. ५६ वर्षीय दिलीप काकडे यांनी बसच्याच मागच्या शिडीला गळफास घेत आत्महत्या केल्यानं विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *