महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑक्टोबर । ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी बजाजने पल्सर या ब्रँडअंतर्गत एफ 250 आणि एन 250 या दोन गाडय़ा दाखल केल्या आहेत. एन 250 ची किंमत 1 लाख 38 हजार रुपये तर एफ 250 ची किंमत 1 लाख 40 हजार रुपये (एक्सशोरूम दिल्ली) असणार आहे. 20 वर्षे पूर्ण झालेल्या बजाजने स्पोर्टस् गटात आपल्या दोन मोटारसायकली दिवाळीपूर्वी सादर केल्या आहेत. स्टायलिश दिसण्यासह विविध वैशिष्टय़े या गाडय़ांमध्ये समाविष्ट असल्याचे समजते.