महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑक्टोबर । अनलॉक व कोरोना संसर्गाच्या कमी झालेल्या वेगामुळे बाजारात विविध उत्पादनांच्या खरेदी विक्रीसोबत आर्थिकघडी सुधारत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सप्टेंबर तिमाहीत सोने मागणी वर्षाच्या आधारे 47 टक्क्यांनी वधारुन 139.1 टनावर राहिली आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिल (डब्लूजीसी)च्या आकडेवारीनुसार सोने मागणी कोरोनापूर्व काळातील झाली आहे.
डब्लूजीसीच्या तिसऱया तिमाहीत गोल्ड डिमांड ट्रेंड्स 2021 च्या प्राप्त अहवालानुसार सप्टेंबर तिमाही दरम्यान व्हॅल्यू टर्ममध्ये सोने मागणी 37 टक्क्यांनी वधारुन 59,330 कोटी रुपयावर पोहोचली आहे.
सोन्याच्या मागणीवर परिणाम हा सकारात्मक राहिला असून याचा बाजारातील घडामोडींवर प्रभाव राहणार असल्याचे डब्लूजीसीचे विभागीय मुख्य कार्यकारी अधिकारी इंडिया सोमासुंदरम यांनी सांगितले आहे.
सर्वसाधारण विक्रीसोबत सोन्याची डिजिटल मागणी अलीकडच्या काळात जोर पकडत असून यामध्ये अनेक पटीने वाढ झाल्याची माहिती आहे. ज्वेलरी कंपन्यांची विक्री वाढविण्यासाठी डिजिटल गोल्ड आणि यूपीआय प्लॅटफॉर्मसोबत करार केला आहे.