T20 World Cup, IND vs NZ: हार्दिक खेळणार की शार्दुल? टीम इंडियाच्या कॅम्पमधील मोठी बातमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑक्टोबर । भारतीय क्रिकेट टीमसाठी (Indian Cricket Team) टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) प्रत्येक मॅच आता महत्त्वाची आहे. टीम इंडियाची पुढील लढत न्यूझीलंड विरुद्ध (India vs New Zealand) रविवारी दुबईत होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीमनं पहिली मॅच गमावली आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या मॅचला ‘करो वा मरो’ चं स्वरुप प्राप्त झालं आहे. या मॅचमधील पराभूत टीमचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात येणार आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडिया कोणत्या प्लेईंग 11 सह उतरणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. माजी क्रिकेटपटूंनी टीम मॅनेजमेंटला काही बदल सुचवले आहेत. सध्या फॉर्मात नसलेल्या हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) जागी शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) समावेश करण्यात यावा असा सल्ला दिला आहे. टीम मॅनेजमेंट मात्र आयपीएल स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमचा पॅटर्न या मॅचमध्ये लागू करण्याचे ठरवले आहे.

टीम इंडियाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) कॅप्टन असलेल्या सीएसकेच्या टीममध्ये एका पराभवानंतर बदल केला जात नाही. टीम इंडिया देखील न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्या मॅचमधील प्लेईंग 11 सह उतरणार आहे. एखादा खेळाडू अनफिट असेल तरच या टीममध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये हार्दिक पांड्यालाचा पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.

शार्दुल ठाकूरनं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील टेस्ट सीरिजमध्ये उपयुक्त बॅटींग केली आहे. पण, अजूनही सातव्या क्रमांकावर शार्दुलपेक्षा हार्दिक अधिक योग्य आहे, असं टीम मॅनेजमेंटचं मत आहे. शार्दुल ठाकूरला बॅटींग करण्यासाठी सातवा क्रमांक लवकरचा आहे, अशी मॅनेजमेंटची धारणा असल्यानं पुन्हा एकदा हार्दिकला संधी मिळणार आहे.

टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11 : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *