महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ नोव्हेबर । विराटनं स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवानंतर सांगितलं,’हे खूप विचित्र आहे. आम्ही बॅटींग आणि बॉलिंगमध्ये कमाल दाखवू शकलो नाही. आम्ही जास्त रन काढले नाहीत. तसंच ते वाचवण्याची धडाडी देखील दाखवली नाही. तुम्ही भारतीय क्रिकेट टीमकडून क्रिकेट खेळता तेव्हा फक्त फॅन्सची नाही तर अन्य खेळाडूंचीही मोठ्या अपेक्षा असतात. या अपेक्षा नेहमी राहणार. आम्ही इतक्यावर्षांपासून हे सर्व अनुभवलं आहे. भारताकडून खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला ते सहन करां लागतं. तुम्ही एक टीम म्हणून खेळता तेव्हा या अपेक्षांचा दबाव जाणवत नाही. पण, मागच्या दोन मॅचमध्ये तसं झालं नाही,’ हे विराटनं मान्य केलं.
विल्यमसन मॅचनंतर बोलताना म्हणाला की, ‘टीम इंडियाविरुद्ध ऑल राऊंड कामगिरीमुळे आम्हाला हा विजय मिळला. आम्ही संपूर्ण मॅच त्यांना दबावात ठेवलं. आमच्या ओपनिंग बॅटर्सनी चांगली कामगिरी केली. आमच्याकडं दोन चांगले स्पिनर्स आहेत. त्यांनी एकत्रित चांगली बॉलिंग केली. ईश सोधी मर्यादीत ओव्हर्स क्रिकेटमधील चांगला बॉलर आहे. येथील वातावरणात त्याची बॉलिंग उपयुक्त ठरत आहे.
आम्ही आमच्या ‘ब्रँड ऑफ क्रिकेट’साठी कटिबद्ध आहोत. त्याचं उदाहरण आमच्या खेळाडूंनी सादर केलं आहे. ईश सोधी वेगवेगळ्या लीगमघ्ये खेळला आहे. आम्ही आता उर्वरित मॅचचा विचार करत आहोत.’ असं विल्यमसननं स्पष्ट केलंय.