12 लाख दिव्यांनी अयोध्या झळाळली, प्रभू श्रीरामांच्या नगरीत विक्रमी दीपदान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ नोव्हेबर ।

करहिं आरती आरतिहर के, रघुकुल कमल बिपिन दिनकर के
पुर सोभा संपति कल्याना, निगम सेष सारदा बखाना

अर्थात : ते दुःखाचे निराकरण करणारे, सूर्यकुलरूपी, कमलवनाला प्रफुल्लित करणारे दिनकर भगवान रामांची आरती करत आहेत. नगराची शोभा, वैभव अन् कल्याणाचे वेद, शेषजी व सरस्वतीजी वर्णन करत आहेत.

भगवान श्रीरामांची नगरी अयोध्येत दिवाळीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सवाने त्रेतायुग जिवंत झाला. दिवसभर चाललेले उत्सव व सायंकाळी भगवान रामांच्या आगमनानंतर लाखाे दिव्यांच्या प्रकाशाने अवधपुरी झळाळली. यानिमित्त १२ लाखांपेक्षा जास्त दिवे तेवण्यात आले. राम की पैडीतील घाटांवर ९ लाख, निर्माणाधीन राम मंदिरात ५१ हजार आणि अयोध्येच्या उर्वरित भागांत २.५ लाख दिवे तेवण्यात आले. यासोबतच अयोध्येचा दीपोत्सव आपलाच विक्रम मोडून पुन्हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाला. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्य व हजारो लोक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *