महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ नोव्हेबर । गेल्या काही आठवड्यांपासून क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cryptocurrency Market) वेगानं धावत असल्याचं चित्र आहे. यात बिटकॉइन (Bitcoin) आणि इथर (Ether) नवीन उच्चांक प्रस्थापित करताना दिसत आहेत. शीबा इनूसारखे (Shiba Inu) मेमेकॉइन आणि स्क्वीड गेमसारखे (Squid Game) टोकन (Token) वेगानं लोकप्रिय होत आहेत. मंगळवारी ( 2 नोव्हेंबर) जगातली सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी असलेला बिटकॉइन त्याआधीच्या 24 तासांच्या तुलनेत 2.13 टक्क्यांनी वधारला. मंगळवारी एका बिटकॉइनची किंमत 63,373.88 डॉलर होती. याचा मार्केट कॅप (Market Cap) 1,194,135,565,973 डॉलर होता. इथेरियम म्हणजेच इथरदेखील 3.12 टक्क्यांनी वधारला. एका इथर कॉइनची किंमत 4,460.05 डॉलर्स निश्चित करण्यात आली होती. शीबा इनू किंवा शीबमध्ये मागील काही दिवसांपासून 1.55 टक्क्यांनी घट झाली. त्याचं मूल्य 0.00007061 डॉलर्स असं होतं.
WazirX ट्रेड डेस्कच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं, की `बिटकॉइन सध्या 61 हजार ते 62 हजार डॉलर्सच्या दरम्यान आहे. या वर्षाअखेरीपर्यंत बीटीसीचं (BTC) मूल्य 6 अंकी होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 1 नोव्हेंबर 2021 रोजी काही तासांत बिटकॉइनचं बाजार भांडवल 1.13 ट्रिलियन डॉलर्सवरून 1.17 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचलं, ही बाब वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येईल.`
क्रिप्टोकरन्सी मार्केटसाठी गेले 24 तास विशेष लक्षवेधी ठरले. मार्केट कॅपिटलायझेशननुसार सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनने कोणतंही महत्त्वपूर्ण पाऊल उचललं नाही. पोलकडॉटने 15 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ मिळवली. तसंच पॅराचिन्स डीओटी मूळ स्थितीनजीक पोहोचलं. मुड्रेक्स या जागतिक क्रिप्टो ट्रेडिंग फर्मचे सीईओ आणि सह-संस्थापक एडूल पटेल यांनी सांगितलं, की `शीबा इनूच्या समर्थकांनी खरेदीचा धडाका सुरू ठेवल्यानंतरही तो अस्थिर राहिला. पोलकाडॉटनं मागील 24 तासांपासून 14.16 टक्क्यांच्या वाढीसह व्यापार कायम ठेवला आहे.` CoinMarketCap च्या आकडेवारीनुसार, पोलकाडॉटच्या एका युनिटची किंमत 50.93 डॉलर्स होती.
मागील 24 तासांत जागतिक क्रिप्टो मार्केट कॅपमध्ये 2.09 टक्के वाढ दिसून आली. मार्केट कॅप मंगळवारी 16.12 वाजता 2.71 होती. त्याचप्रमाणे गेल्या 24 तासांत एकूण क्रिप्टो मार्केट व्हॉल्यूम 136.88 अब्ज डॉलर्स होती. CoinMarketCapच्या आकडेवारीनुसार मागील काही दिवसांच्या तुलनेत ही किंमत 0.57 टक्क्यांनी अधिक आहे. एकूण क्रिप्टो मार्केट कॅप 2.63 ट्रलियन डॉलरच्या पुढे पोहोचली आहे.
Elonomics : 24.17 डॉलर्स – मागील 24 तासांत 2,340 .75 टक्क्यांनी वधारला
United Emirates Decentralized Coin :0.4466 डॉलर्स – मागील 24 तासांत 1024.27 टक्क्यांनी वधारला.
Melalie : 0.1288 डॉलर्स – मागील 24 तासांत 630.28 टक्क्यांनी वाढ
Green Monzilla : 0.00000004796 डॉलर्स – मागील 24 तासांत 330.66 टक्क्यांनी वधारला.
OOGI : 0.0035 डॉलर्स – मागील 24 तासांत 263.34 टक्क्यांनी वाढ