महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ नोव्हेबर । सरकारी तेल कंपन्यांनी आज 9 नोव्हेंबर रोजी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Price Today) दर जारी केले आहेत. आज देखील इंधनाच्या दरात (Fuel Price Today) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन दरांच्या मते, आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Price) 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे. याआधी या आठवड्यात रविवार आणि सोमवारी देखील इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.
केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल साधारण 10 रुपयांनी कमी झालं होतं. दिवाळी दिवशी अनेक शहरात एवढी कपात पाहायला मिळाली होती. अनेक राज्यांमध्ये तर राज्य सरकारांनी देखील किंमती कमी केल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेल 12-12 रुपयांनी कमी झालं आहे.
# दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर
# मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर
# चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर
# कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर
# नोएडा पेट्रोल 95.51 रुपये आणि डिझेल 87.01 रुपये प्रति लीटर
# श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लीटर
दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.