महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० नोव्हेबर । एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेत शासनाने मंगळवारी रात्री एसटीच्या स्थानकांमधून खासगी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बुधवारी म्हणजेच आजपासून स्वारगेट स्थानकातून सकाळी आठ वाजल्यापासून खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या सोडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वारगेट स्थानकातून सोडण्यात येणाऱ्या या खासगी बसचे भाडे एसटीच्या दरात असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची येथे गर्दी होत आहे. दरम्यान, प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी स्वारगेट येथील स्वच्छतागृहे बंद केली आहेत. तसेच आता एसटी स्थानकामधून खासगी गाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे संपवा आणखी चिघळण्याची शक्यता आहे.