एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप चिघळतोय, फडणवीसांनी सरकारला मार्ग सांगितला? सरकार करणार का?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० नोव्हेबर । राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातील एसटी कर्मचारी जमायला सुरुवात झालीय. यावेळी भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे सरकारला लक्ष करत एसटी कर्मचारी संपावर तोडगा काढण्याबाबत सल्लाही दिला आहे. (Devendra Fadnavis appeals to resolve the strike of ST workers sensitively)

‘एसटी संपाबाबत सरकारची भूमिका असंवेदनशील. संप चिघळू नये असं आम्हाला वाटतं पण सरकार दमनशाहीचा वापर करत आहे. हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न होत असेल तर ते अजून वाढेल. चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. कर्मचाऱ्यांना दिलासा द्यायला हवा. राज्य सरकारनं तात्काळ चर्चा करुन यावर तोगडा काढायला हवा. आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करायला तयार. आमचे आमदार गोपीचंद पडळकर, इतर सर्व आमदार, सदाभाऊ खोत आंदोलनात आहेत. सरकारनं संवेदनशीलता दाखवावी’, असं आवाहन फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केलंय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *