Akshay Karnewar Bowling: अफलातून कामगिरी; दोन्ही हातांनी गोलंदाजी, टी-२०मध्ये दोन दिवसात २ वर्ल्ड रेकॉर्ड

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० नोव्हेबर । दोन्ही हाताने गोलंदाजी करणाऱ्या यवतमाळच्या अक्षय कर्णेवारच्या फिरकीची जादू सलग दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सलग दुसऱ्या दिवशी धमाका केला. अक्षयने ग्रुप फेरीत सिक्किमविरुद्ध ४ टकात फक्त ५ धावा देत ४ विकेट घेतल्या.

विदर्भकडून खेळणाऱ्या यवतमाळच्या अक्षयने सोमवारी ४ षटकात एकही धावा न देण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. त्यानंतर मंगळवारी त्यांनी आणखी एक विक्रम केला. विदर्भने प्रथम फलंदाजी करत २०६ धावांचे लक्ष्य दिले होते. सिक्किमला २० षटकात ८ बाद ७५ धावा करता आल्या आणि त्यांचा १३० धावांनी पराभव झाला. अक्षयने याआधीच दोन हातांनी गोलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या सामन्यात देखील त्याच्या दोन्ही हातांची गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना विदर्भकडून जितेश शर्माने नाबाद ५४ तर कर्णधार अक्षय वाडकरने ४० धावा केल्या. सिक्किमकडून सुमित सिंह आणि पल्जोर तमांगने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

अक्षयने सोमवारी मणिपूरविरुद्ध ४ षटकात एकही धाव न देता २ विकेट घेतल्या होत्या. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये चार षटकात एकही धाव न देणारा तो पहिला गोलंदाज ठरला होता. अक्षनने ३ षटके गोलंदाजी केली आणि त्यानंतर अन्य गोलंदाज त्याच्या जागी गोलंदाजीसाठी आला. त्याने ३ षटकात २ विकेट घेतल्या होत्या. मैदानावर कोणालाही माहिती नव्हते की तो विश्व विक्रम करू शकतो. तेव्हा ड्रेसिंग रुममधून याची माहिती देण्यात आली आणि अक्षयला अखेरचे षटक दिले गेले. या षटकात देखील त्याने धाव दिली नाही आणि वर्ल्ड रेकॉर्ड केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *