मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या प्रमुख चार शहरांमध्ये आज पुन्हा पेट्रोल स्वस्त?

Spread the love

महाराष्ट्र 24 -नवी दिल्ली
आज सलग दुसऱ्या दिवसी पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) किंमतीत घट झाली आहे. पेट्रोल 6 पैसे तर डिसेल 14 पैसे प्रतिलीटर स्वस्त झालं आहे. बऱ्याच दिवसांनंतर देशात सलग दुसऱ्या दिवसी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवणाऱ्या इंडियन ऑईल (Indian Oil) च्या वेबसाईटनुसार मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किमती अनुक्रमे 71.14 रुपये, 76.83 रुपये, 73.82 रुपये आणि 73.91 रुपये प्रति लीटर असणार आहेत. तर मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या देशातल्या प्रमुख चार शहरांमध्ये डिझेलच्या किमती अनुक्रमे 63.81 रुपये, 66.82 रुपये, 66.14 रुपये और 67.34 रुपये प्रति लीटर असणार आहे.

पेट्रोलचे ताजे दर कुठे पाहायचे?
केंद्राच्या निर्णयानंतर आता पेट्रोलची निर्मिती करणाऱ्या HPCL, BPCL आणि IOC या कंपन्या रोजच्या रोज पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाहीर करत असतात. तुम्ही सुद्धा पेट्रोल भरण्याच्या आधी रोजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज तपासून पाहू शकता.

यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून 92249 92249 या मोबाईल नंबर वर SMS करायचा आहे. लगेचच तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे त्या त्या दिवसाचे दर दल एसएमएस वर मिळतील. तुमच्या मोबाईलवरून RSP<स्पेस> पेट्रोल पंप चालकाचा कोड नंबर लिहून 92249 92249 वर एसएमएस करायाचा आहे. देशातील सगळ्यात मोठी तेल उत्पादक कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation Limited) ने जाहीर केलं आहे की पूर्ण देशभरात BS-VI पेट्रोल वितरण आणि विक्रीची तयारी पूर्ण झाली आहे. 1 एप्रिल 2020 पासून संपूर्ण देशभरात BS-VI पेट्रोल आणि डिझेल वितरीत केलं जाणार आहे. याची किंमत याआधीच्या पेट्रोल आणि डिझेलपेक्षा थोडी जास्त असणार आहे. इंधनाच्या ज्वलनातून होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी ‘BS-IV’ वरुन ‘BS-VI’ या इंधनाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अवघ्या तीन वर्षांतच नव्या इंधनाची अंमलबजावणी करण्यात यश आले आहे. अशी कामगिरी जगाच्या पाठीवर कोणत्याही देशाने केलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *