Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल सामान्यांना न परवडणारेच,अजूनही अनेक शहरांत दर शंभरीपार! काय आहे आजचा भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ नोव्हेबर । सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price Today) नवे दर जारी केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले होते, त्यानंतर बऱ्याच कालावधीसाठी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. जरी किंमती वाढत नसल्या तरी त्यात कपातही झालेली नाही. त्यामुळे आजही इंधनाचे दर (Fuel Rates Today) अनेकांच्या आवाक्याबाहेरच आहेत. IOCL ने बुधवारी देखील नवे दर जारी केले आहेत, आजही किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Price) 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे. याआधी या आठवड्यात रविवारपासून बुधवारपर्यंत इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल साधारण 10 रुपयांनी कमी झालं होतं. दिवाळी दिवशी अनेक शहरात एवढी कपात पाहायला मिळाली होती. अनेक राज्यांमध्ये तर राज्य सरकारांनी देखील किंमती कमी केल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेल 12-12 रुपयांनी कमी झालं आहे.

आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol-Diesel Rate Today)

>> दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर

>> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर

>> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर

>> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *