व्यवसायिकांचे क्रिप्टोकरन्सीला प्राधान्य; सोन्यातील गुंतवणुकीत घट, काय आहेत कारणे?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ नोव्हेबर । जगभरातील प्रमुख व्यवसायिक आणि गुंतवणूकदार आपली सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक कमी करत आहेत. तर दुसरीकडे क्रिप्टोकरन्सी विशेषतः बिटकॉइनमधील गुंतवणुकीमध्ये वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यात व्यवसायिकांचा कल वाढतो आहे. परिणामी बिटकॉनच्या किमती सातत्याने वाढत आहेत.

सध्या क्रिप्टोकरन्सी हा गुंतवणुकीचा एक प्रमुख मार्ग बनला असून, अधिकाधिक चांगल्या परताव्याच्या आशेन क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक वाढत आहे. अनेक मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या देखील क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. अमेरिकेतील प्रमुख इन्वेस्टमेंट कंपनी असलेल्या जेफरीने देखील आपली सोन्यामध्ये केलेली पाच टक्के गंतवणूक काढून, क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनमध्ये केली आहे. याबाबत माहिती देताना कंपनीने सांगितले की, सोन्याचे दर सातत्याने कमी होत आहेत. मात्र दुसरीकडे सध्या बिटकॉइनच्या दरात तेजी असल्याने आम्ही क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूकीला प्राधान्य दिले. तुम्ही जर दीर्घकाळासाठीच्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर बिटकॉइन हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

क्रिप्टोकरन्सीची स्वीकारार्हता वाढली
जगभरात क्रिप्टोकरन्सीची स्वीकारार्हता वाढत आहे. अमेरिकेमधील जास्तीत जास्त नागरिक क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या दरामध्ये तेजी आली आहे. गेल्या वर्षभरात क्रिप्टोकरन्सी विशेषतः बिटकॉइनमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल्याचे दिसून येत आहे. भारताबाबत बोलायचे झाल्यास भारतामध्ये क्रिप्टोकरन्सीचे तब्बल 1.5 कोटी गुंतवणूकदार असून, क्रिप्टोकरन्सीमधील त्यांची एकूण गुंतवणूक 75 हजार कोटी रुपये एवढी आहे.

कमी जोखीम
क्रिप्टोकरन्सी ही एकप्रकारची व्हर्च्यूअल करन्सी असल्याने त्यामध्ये गुंतवणूक करणे देखील सोपे असते. सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला बँक लॉकर आणि इतर साधनांची आवश्यकता भासते. तसेच इतर दुसऱ्या देखील अनेक जोखमी असतात. त्या सर्व जोखीम क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना कमी होतात. क्रिप्टोकरन्सीची ऑनलाईन खरेदी विक्री होत असल्याने आता त्यामधील गुंतवणूक वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *