महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ नोव्हेबर । इंग्लंडमध्ये रातोरात एका मायलेकाचं नशीब पालटलं आहे. येथील आई आणि मुलाच्या एका जोडीला 30-30 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. महिलेने आपल्या मुलाच्या सांगण्यावरून पहिल्यांदा लॉटरी तिकीट विकत घेतले होते, त्यानंतर तिचे आणि तिच्या मुलाचे नशीब चमकले आहे.
‘मिरर यूके’ने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडमधील मर्सीसाइड येथील रहिवासी असलेल्या 60 वर्षीय कॅथलीन मिलरने तिचा 35 वर्षीय मुलगा पॉल याच्या सांगण्यावरून पीपल्स पोस्टकोड लॉटरीचे तिकीट विकत घेतले होते. लॉटरीचा लकी ड्रॉ काढण्यात आला तेव्हा त्यांना 30,000 पौंडची (29 लाख 89 हजार रुपये) लॉटरी लागली.
कॅथलीन आणि तिचा मुलगा पॉल या दोघांना प्रत्येकी 30 लाखांची लॉटरी ही एकाचवेळी लागली आहे. लॉटरी जिंकल्यानंतर कॅथलीन म्हणाली, “माझा मुलगा पीपल्स पोस्टकोड लॉटरी खेळायचा. काही दिवसांपूर्वी त्याने मीही तिकीट विकत घ्यावी, म्हणून हट्ट करू लागला. म्हणून मीही सहज तिकीट खरेदी केली. मात्र मला अजिबात वाटलं नव्हतं की आम्हा दोघांनाही लॉटरी लागेल.”