महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ नोव्हेबर । तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price Today)जारी केले आहेत. दरम्यान आज शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही (Fuel Price Today) बदल झालेला नाही आहे. सरकारने उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाली होती. त्यानंतर गेल्या बऱ्याच कालावधीपासून दरांमध्ये वाढ झालेली नाही.
केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल साधारण 10 रुपयांनी कमी झालं होतं. दिवाळी दिवशी अनेक शहरात एवढी कपात पाहायला मिळाली होती. अनेक राज्यांमध्ये तर राज्य सरकारांनी देखील किंमती कमी केल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेल 12-12 रुपयांनी कमी झालं आहे.
शनिवारी पेट्रोल-डिझेल दरात कोणताही बदल न झाल्याने आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे.
काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर?
@ दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर
@ मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर
या शहरांत 100 रुपयांपेक्षाही कमी आहेत पेट्रोलचे दर
>> पोर्ट ब्लेयर पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लीटर
>> नोएडा पेट्रोल 95.51 रुपये आणि डिझेल 87.01 रुपये प्रति लीटर
>> ईटानगर पेट्रोल 92.02 रुपये आणि डिझेल 79.63 रुपये प्रति लीटर
>> चंदीगड पेट्रोल 94.23 रुपये आणि डिझेल 80.9 रुपये प्रति लीटर
>> आयजोल पेट्रोल 94.26 रुपये आणि डिझेल 79.73रुपये प्रति लीटर
>> लखनऊ पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 86.8 रुपये प्रति लीटर
>> शिमला पेट्रोल 95.78 रुपये आणि डिझेल 80.35 रुपये प्रति लीटर
>> पणजी पेट्रोल 96.38 रुपये आणि डिझेल 87.27 रुपये प्रति लीटर
>> गंगटोक पेट्रोल 97.7 रुपये आणि डिझेल 82.25 रुपये प्रति लीटर
>> रांची पेट्रोल 98.52 आणि डिझेल 91.56 रुपये प्रति लीटर
>> शिलाँग पेट्रोल 99.28 आणि डिझेल 88.75 रुपये प्रति लीटर
>> देहरादून पेट्रोल 99.41 आणि डिझेल 87.56 रुपये प्रति लीटर
>> दमण पेट्रोल 93.02 आणि डिझेल 86.9 रुपये प्रति लीटर