BCCI ची होणार चांदी, IPL च्या कमाईवर द्यावा लागणार नाही टॅक्स

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ नोव्हेबर । भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआय (BCCI) देशातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था आहे. फक्त आयपीएलमधून (IPL Cricket League) बीसीसीआयला अब्जावधी रूपयांची कमाई होते. ही सर्व कमाई आता करमुक्त असणार आहे. या प्रकरणात झालेल्या कायदेशीर लढाईत बीसीसीआयचा विजय झाला आहे.

देशात खेळाचा विशेषत: क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी ही स्पर्धा आहे, त्यामुळे यावर कोणताही टॅक्स लावू नये असा बीसीसीआयचा युक्तीवाद होता. इन्कम टॅक्स अपीलेट ट्रिब्यूनल (ITAT) यांनी बीसीसीआयचा हा युक्तीवाद मान्य केला आहे. बीसीसीआयला आयपीएलमधून कमाई होत असली तरी त्यांचा हेतू हा क्रिकेटचा प्रसार करणे आहे, त्यामुळे या स्पर्धेतून मिळणारी करमुक्त असेल, असा निर्णय ITAT नं दिला आहे.

टॅक्स डिपार्टमेंटनं 2016-17 साली बीसीसीआयला या विषयावर नोटीस दिली होती. यामध्ये आयपीएलमधून होणाऱ्या कमाईला इन्कम टॅक्स कायदा (Income Tax Act) 12 A अन्वये मिळणारी सवलत का रद्द करू नये? अशी विचारणा केली होती. आयपीएल हे मनोरंजनाचे माध्यम असल्याचा आयकर विभागाचा दावा होता. या नोटीशीच्या विरोधात बीसीसीआ.नं ITAT चा दरवाजा ठोठावला होता.

आमचा मुळ हेतू क्रिकेटला चालना देणे हा असून त्याचं आयपीएल हे एक माध्यम आहे. आयपीएलमधून मिळालेला पैसा क्रिकेटच्या प्रमोशनवर खर्च करण्यात येतो, असा बीसीसीआयचा दावा आहे. या प्रकरणात बराच काळ सुनवाणी सुरू होती. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर या प्रकरणात अखेर बीसीसीआयचा विजय झाला आहे.खेळाला लोकप्रिय करण्यासाठी एखाद्या स्पर्धेचे रूपांतर या प्रकारात केले आणि त्याला जास्त स्पॉनर्स मिळाले तर साधनसंपत्ती निर्माण होऊ शकते, पण यामुळे क्रिकेटला लोकप्रिय बनवण्याच्या मुळ हेतूला कुठेही धक्का बसत नाही, असं मत ITAT नं दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *