महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ नोव्हेबर ।
मेष :-
आजचा दिवस चांगला जाईल. उपद्रवी लोकांच्या मागे जाऊ नका. धोकादायक ठिकाणी प्रवास करू नका. समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव राहील. आपले कौतुक केले जाईल.
वृषभ:-
व्यवसायात तडजोड करावी लागेल. थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. तिखट पदार्थांचे सेवन करू नका. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. जोडीदाराशी नाते अधिक दृढ होईल.
मिथुन:-
बदलांना सकारात्मकतेने सामोरे जा. आपला विचार जवळच्या व्यक्तीसमोर मांडा. दिवस उत्साहात जाईल. कोणाबद्दलही वाईट चिंतू नका. सारासार विचार करून घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.
कर्क:-
संमिश्र घटनांचा दिवस. घरातील वातावरण आनंदी व उत्साही असेल. नोकरी, व्यवसायात घाई टाळावी. यश व प्रगती साध्य करता येऊ शकेल. जनसंपर्कात वाढ होईल.
सिंह:-
सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव दिसून येईल. परोपकाराची भावना प्रबळ होईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करता येईल. दिनक्रम व्यस्त राहील. आत्मविश्वासाने केलेली कामे यशकारक ठरतील.
कन्या:-
आजचा दिवस शुभ असेल. कष्ट काही प्रमाणात कमी होऊ शकतात. घरासाठी नवीन खरेदी कराल. स्पर्धेत यश मिळेल. मन प्रसन्न राहील.
तूळ:-
कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टी शिकायला मिळतील.नातेवाईकांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. आत्मविश्वासाने मुलाखत द्या. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.
वृश्चिक:-
अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. मित्रांशी दुरावलेले संबंध सुधारतील. नवीन गुंतवणूक फायद्याची ठरेल. मुलांच्या कृतीने मान उंचावेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल.
धनू:-
सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. आजचा दिवस शुभ ठरेल. हातातील कामात यश येईल. कठोर मेहनतीने मनोकामना पूर्ण कराल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील.
मकर:-
कोर्ट-कचेरीच्या कामात अडकू नका. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. फार विचार करण्यात वेळ घालवू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. नको त्या प्रलोभनात अडकू नका.
कुंभ:-
स्वत:च्या कामातील प्रगतीकडे लक्ष ठेवा. महत्त्वाच्या निर्णयात गोंधळू नका. मिळकत वाढीस लावण्याचे मार्ग शोधाल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मनातील इच्छा पूर्ण होईल.
मीन:-
हातातील काम सोडून भलत्याच्या मागे धावू नका. न पटणार्या गोष्टी करू नका. उगाचच चिडचिड करू नका. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. गुरुप्रती निष्ठा कायम ठेवावी.