महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ नोव्हेबर । कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये 12 आठवडय़ांचे अंतर ठेवल्याचे उत्तम परिणाम दिसून आल्याचे आरोग्य तज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे अशा नागरिकांना कोणत्याही बुस्टर डोसची गरज नाही असे त्यांनी सांगितले आहे. सीरो सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन डोसमधील अंतर कमी करण्याची गरज नसल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
सीरो सर्वेक्षणाचा अहवाल पेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये सध्या 12 ते 16 आठवडय़ांचे अंतर ठेवले जाते. कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतल्यानंतर तीन महिन्यांनी शरीरामध्ये कोरोना प्रतिबंधक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचे सर्वेक्षणात दिसून आले.