महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आता मावळात; स्ट्रॉबेरीला परदेशातूनही मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ नोव्हेबर । हिवाळा म्हणलं की सर्व जण महाबळेश्वरला जाऊन लाल, केशरी चुटुक स्ट्रॉबेरी खाण्यासाठी जात असतात. पण आता महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी थेट मावळात पिकू लागली आहे. (maval-news-Mahabaleshwar-strawberries-are-now-in-decline-Demand-for-strawberries-from-abroad) मावळातील प्रगतीशील शेतकरी प्रदीप धामणकर यांनी स्ट्रॉबेरीचे पीक मावळात घेण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. आता या प्रयोगाला यश येऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील स्थान मिळाले आहे. काय आहे नेमकी मावळची स्ट्रॉबेरी पाहुयात.

मावळ तालुका हा थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे भाताचे आगार म्हणून देखील मावळ प्रसिद्ध आहे. भात शेतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मावळ तालुक्यात आता स्ट्रॉबेरी देखील येऊ लागली आहे. महाबळेश्वरमध्ये पिकणारी विंटर डाऊन नावाची स्ट्रॉबेरी प्रजाती आता मावळात देखील येऊ लागली आहे. मावळमधील प्रगतिशील शेतकरी प्रदीप धामणकर यांनी महाबळेश्वर येथून विंटर डाऊन या जातीच बीज आणली आणि ती रुजवली. आता तीस हजार स्केअर फूटवर पंधरा हजार झाडे लावून स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेतलं जातं आहे. विशेष म्हणजे या स्ट्रॉबेरीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एक हजार ते पंधराशे रुपये किलोने या स्ट्रॉबेरीची विक्री आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केली जाते. प्रामुख्याने दुबई, मस्कत, सिंगापूर या देशांमध्ये मावळातील ही स्ट्रॉबेरी पाठवली जाते.

स्ट्रॉबेरीच हे उत्पन्न घेण्यासाठी प्रदीप धामणकर यांना केवळ पाच लाख रुपये खर्च आला. तर आता स्ट्रॉबेरी तयार होऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री झाल्यावर त्यांना किमान पंचवीस लाख रुपये नफा होण्याची आशा आहे. तीस हजार स्क्वेअर फूट जमिनीत त्यांनी गादी वाफे तयार करून त्यावर गीर गायीचं गोमूत्र टाकून जीवामृत टाकले. उत्पन्न काढले. एका रोपट्याला किमान एक किलो स्ट्रॉबेरी येत असल्याचे देखील धामणकर सांगतात. मावळमधील शेतकऱ्यांनी केवळ भात, ऊस या पिकांवर अवलंबून न राहता असे विविध प्रयोग करून उत्पन्न घ्यावे; असे देखील आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *