विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात मुलींचा जन्मदर घसरला

Spread the love

पुणे : संपूर्ण देशात महाराष्ट्र या राज्याची पुरोगामी राज्य म्हणून ओळख असताना काही बाबी मात्र चिंता वाढवणाऱ्या आहेत. एकीकडे हिंगणघाट सारखी घटना जिथे प्राध्यापिकेला भर रस्त्यात जाळून टाकण्यात आले. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातच पुण्या सारख्या जिल्ह्यात ज्याला विद्याचे माहेरघर म्हणून ओळखले जाते त्या शहरात मुलींचा जन्मदर घटत आहे.

माहिती अधिकाराचे कार्यकर्ते विवेक वेलणकर यांना मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात मुलींचा जन्मदारात दर हजारी तब्बल 23 ने घसरणं झाली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2016 ते 2019 या कालावधीत जन्मदर घटल्याचे स्पष्ट दिसत आहे.

2016 मध्ये हजारी 932 असणारा मुलींचा जन्मदर 2017 मध्ये 926 होता. तर जन्मदर 2018 मध्ये मुलींचा जन्मदर 927 पर्यंत आला. हाच दर वर्ष 2019 या एकाच वर्षात 904 पर्यंत खाली घसरला आहे.

पुण्याला विद्येचे माहेरघर म्हटलं जातं आणि तिथेच मुलींचा जन्मदर खाली घसरल्याने चित्र नक्कीच चिंताजनक आहे. राज्यात गर्भलिंग निदान चाचणीला कायद्यानुसार बंदी आहे. असं असताना मुलींच्या जन्मदरात जर घट होत असेल तर गर्भलिंग निदान चाचणी न करण्याच्या कायद्याची कठोर अमलबजावणी राज्यात होते की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *