हडपसर स्थानकासाठी डिसेंबरचा मुहूर्त

Spread the love

महाराष्ट्र २४ ; पुणे – पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करून नव्या गाड्या सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे हडपसर रेल्वे स्थानक पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यास डिसेंबर महिना उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले. भूसंपादनासाठी होत असलेल्या विलंबामुळे आता नवा मुहूर्त पुढे आला आहे. त्यामुळे पुण्यात नव्या गाड्या त्यानंतरच सुरू होतील, अशी चिन्हे आहेत.

पुणे रेल्वे स्थानकाची क्षमता संपल्यामुळे तेथून नव्या गाड्या सुरू करता येत नाहीत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाला पर्याय म्हणून हडपसर रेल्वे स्थानकाची उभारणी करण्याची चर्चा गेल्या पाच वर्षांपासून सुरू होती. या नव्या स्थानकावरून लांब पल्ल्याच्या गाड्या थेट सोडता येतील, तसेच त्यामुळे पुणे स्थानकावरील ताण कमी होईल, असे गृहीत धरून रेल्वे गेल्यावर्षी ३५ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून दिली आहे.

त्यानुसार हडपसर रेल्वे स्थानकात गेल्या वर्षी जानेवारीमध्ये काम सुरू झाले आहे. त्याची मुदत १८ महिन्यांची आहे. त्यानुसार यावर्षी जूनमध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु बांधकाम अद्याप रखडले आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे रेल्वेच्या पुणे या स्थानकावर २४ डब्यांची रेल्वे थांबता येईल, या दृष्टीने सुमारे ४५० मीटर लांबीचे प्लॅटफॉर्म उभारण्यात येत आहेत. वेटिंग एरिया, स्वच्छतागृह, तिकीट घर, पोलिस कक्ष आदी सुविधाही येथे उपलब्ध असतील. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी नेहमीच्या दोन लोहमार्गांशिवाय अन्य दोन लोहमार्गही उभारण्यात येणार आहेत.

सुमारे ५० हजार चौरस मीटर जागेत स्थानक कार्यान्वित होणार आहे. त्यात काही समस्या उद्‌भवल्या आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी महापालिकेशी चर्चा सुरू आहे. त्यासाठी किती कालावधी लागेल, यावर स्थानकाचे भवितव्य अवलंबून असेल, असे रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *