Cleanliness Survey 2021: सलग पाचव्यांदा ‘हे’ शहर ठरलंय देशातील ‘सर्वात स्वच्छ शहर’!

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० नोव्हेंबर । मध्य प्रदेशातल्या इंदूर या शहराला देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून गौरवण्यात आलं आहे. आज (शनिवारी) दिल्लीत झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वच्छ ‘सर्वेक्षण २०२१’ मधल्या विजेत्या शहरांचा गौरव करण्यात आला. नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री भूपेंद्र सिंह यांनी १२ कोटी रुपयांचा सफाई मित्र आणि ५ स्टार रेटिंगचा पुरस्कार हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला. (Indore, Cleanest City in India)

स्वच्छ शहरांच्या यादीत इंदूर मागोमाग गुजरातमधल्या सुरत शहरानं दुसरा, तर आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहरानं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वांत स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार पटकावला.

उल्लेखनीय म्हणजे, मध्य प्रदेशची ‘औद्योगिक राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दररोज १२०० टन कचरानिर्मिती होत असल्याची अधिकृत माहिती सांगते. तरीही शहरात स्वच्छता राखण्यात प्रशासकीय अधिकारी यशस्वी ठरलेत. इंदूर या शहरानं सलग पाचव्या वर्षी ‘देशातील सर्वात स्वच्छ शहर’ म्हणून मान मिळवलाय. याबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जिल्हाधिकारी मनीष सिंह आणि इतर अधिकाऱ्यांचं कौतुक केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *