वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील घटना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० नोव्हेबर । व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेलेल्या महिला वनरक्षकावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात महिला वनरक्षक स्वाती ढुमणे (वय – 43) यांचा मृत्यू झाला. या घटनेने वनविभागात खळबळ उडाली आहे.

स्वाती ढुमणे या ताडोबाच्या कोलारा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 97 वाघ्र गणनेची पूर्वतयारी करण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी वाघाने हल्ला केला. सोबत असलेल्या चार वनमजुरांनी वाघाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघाने स्वाती यांना ओढून दाट जंगलात नेले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्वाती यांच्या शोधासाठी शोधमोहीम राबविली गेली. अखेर त्यांचा मृतदेह सापडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *