मुंबईत 13 इमारती सील ; कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ नोव्हेबर । देशभरातील कोरोनाची प्रकरणं सध्या काही प्रमाणात कमी होत आहेत, परंतु धोका अद्याप टळलेला नाही. मुंबईतील काही भागांतून कोरोनाची नवीन प्रकरणं सातत समोर येतायत. त्यामुळे शनिवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने 13 इमारती सील केल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बंध लादले गेले नाहीत तर कोरोनाची प्रकरणं वाढू शकतात, असा धोका अधिकाऱ्यांना आहे. शनिवारी मुंबईत कोरोनाचे एकूण 195 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एका व्यक्तीचा विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.

मुंबई महापालिकेच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत मुंबईतील रुग्णालयातून 350 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या दरम्यान कोरोनाच्या 37,661 चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत आतापर्यंत 1,21,08,846 नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या रिकवरी रेट 97 टक्के आहे.
दुसरीकडे, पुण्याच्या ग्रामीण भागात 100 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि पुणे शहरात 88 नवीन रुग्ण आढळले आहेत.

बीएमसीच्या मताप्रमाणे, सध्या सर्वाधिक 314 एक्विव प्रकरणं मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागात आहेत. त्यानंतर वांद्रेत 214, अंधेरी पूर्वमध्ये 196 आणि बोरिवलीमध्ये 191 प्रकरणं आहेत.मुंबईत सध्या 20 हून अधिक इमारती सील करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती नियंत्रणात आहे. यावेळी लोकांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितलं जातंय.

शनिवारी महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या 833 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर आणखी 15 जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 66,29,577 लोकांना संसर्ग झाल्याची नोंद आहे. तर 1,40,722 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *