2024 मध्ये येणार शाओमीची कार ; ओप्पो इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ नोव्हेबर । स्मार्टफोन कंपन्या वेगाने इलेक्ट्रिक वाहनांसोबत ऑटोमोटिव्ह स्पेसमध्ये प्रवेश करण्याची योजना आखत आहेत. यामध्ये ताज्या आकडेवारीनुसार मोबाईल बनविणारी कंपनी ओप्पो भारतीय बाजारात लवकरच म्हणजे 2024 मध्ये इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत आहे. नवीन अहवालानुसार कंपनी भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहन आणण्यावर काम करत असून अगोदरपासून कंपनी ही योजना आखत असल्याची माहिती आहे.

माध्यमांच्या अहवालानुसार व अन्य स्रोतानुसार मिळालेल्या माहितीनुसार बीबीके इलेक्ट्रॉनिक्सचा स्मार्टफोन ब्रँडसह ओप्पो, रियलमी आणि वनप्लस यावेळी भारतात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये विकासात्मक काम करत असल्याची माहिती आहे. त्याबाबतची योजना आखली जात आहे. वर्ष 2024 च्या प्रारंभी ओप्पो आपली पहिली इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.

ऍपल आपल्या टायटनच्या प्रकल्पाअंतर्गत कार ‘ऍपल ड्रायव्हरलेस कार’ बाजारात आणण्याची तयारी करत आहे. सदरची कार ही संपूर्ण सेंसरवर आधारीत राहणार असल्याने यासह अन्य स्मार्ट उपकरणांवर आधारीत ही कार बाजारात आणली जाणार असल्याची माहिती आहे.हुआईही चालू महिन्यात अवतार 11 नावाची इलेक्ट्रिक कार सादर करण्याची शक्यता आहे. याची विशेषतः म्हणजे सिंगल चार्जवर तब्बल 700 किमी धाव घेणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

शाओमीचे सीईओ लेई यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी 2024 मधील पहिल्या सहामाहीत आपल्या इलेक्ट्रिक कारचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करणार आहे. यामुळे येणाऱया काळात विविध इलेक्ट्रिक कार्स बाजारात येणार असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *